PM किसान e-KYC 2026: 30 जूनपूर्वी करा e-KYC, अन्यथा अडकू शकतो 2,000 रुपयांचा पुढील हप्ता

|
Facebook

PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी e-KYC 30 जूनपूर्वी करा Face Authentication पद्धत सर्वात सोपी PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचे हप्ते मिळवत राहण्यासाठी 30 जून 2026 पूर्वी e-KYC करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र सरकारने 20 मे 2026 पासून ही मोहीम सुरू केली आहे. ही e-KYC घरबसल्या मोबाईलवरून Face Authentication पद्धतीने करता येते CSC केंद्रात जाण्याची गरज नाही. एकाच e-KYC ने PM किसानचे वार्षिक 6,000 आणि नमो शेतकरीचे वार्षिक 6,000 असे एकूण 12,000 रुपये वर्षाला मिळत राहतात. e-KYC कशी करायची, कोणते ॲप लागते, Face Scan कसे करायचे, M-PIN कसा सेट करायचा आणि इतर शेतकऱ्यांची KYC एकाच मोबाईलवरून कशी करायची हे सगळे या लेखात सांगणार आहोत.

PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजना काय आहेत?

PM किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये तीन हप्त्यांत दिले जातात म्हणजे दर चार महिन्यांनी 2,000 रुपये. हे पैसे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा होतात. नमो शेतकरी महासन्मान निधी ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत PM किसानचे लाभार्थी असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी 6,000 रुपये वार्षिक दिले जातात. म्हणजे एकाच शेतकऱ्याला केंद्राकडून 6,000 आणि राज्याकडून 6,000 असे मिळून वर्षाला 12,000 रुपये मिळतात. या दोन्ही योजना एकमेकांशी जोडलेल्या आहेत. PM किसानच्या डेटाबेसमधूनच नमो शेतकरी महासन्मान निधीची यादी तयार होते. त्यामुळे जो PM किसानचा लाभार्थी आहे तोच नमो शेतकरीचाही लाभार्थी असतो. आणि म्हणूनच एकच e-KYC केली की दोन्ही योजनांचे पैसे मिळत राहतात.

e-KYC का बंधनकारक आहे 30 जून 2026 ची मुदत का आली?

PM किसान योजनेत लाखो बनावट लाभार्थी असल्याचे आधीपासूनच उघड होत आहे. मृत व्यक्तींच्या नावावर पैसे जात होते, अपात्र लोकांना पैसे मिळत होते, एकाच कुटुंबात अनेक नोंदणी होत्या. हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने वार्षिक e-KYC बंधनकारक केली. e-KYC म्हणजे शेतकऱ्याने प्रत्यक्षात जिवंत असल्याचे आणि आपण तेच आहोत हे आधार किंवा चेहरा स्कॅनद्वारे सिद्ध करणे. हे दरवर्षी करायचे असते कारण वर्षाला एकदा तपासणी झाली तर बनावट लाभार्थी आपोआप बाहेर पडतात. 30 जून 2026 ही या वर्षाची अंतिम मुदत आहे. या तारखेपूर्वी e-KYC न केल्यास पुढचा हप्ता थांबेल. एकदा हप्ता थांबला की तो परत मिळवण्यासाठी पुन्हा KYC करायला लागते आणि प्रक्रियेला वेळ लागतो. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता आत्ताच करणे शहाणपणाचे आहे.

e-KYC कोणकोणत्या पद्धतीने करता येते?

सरकारने तीन पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. पहिली पद्धत म्हणजे PM किसान पोर्टलद्वारे OTP e-KYC. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, आधार नंबर जोडलेल्या मोबाईलवर OTP येतो, तो टाकून e-KYC होते. दुसरी पद्धत म्हणजे बायोमेट्रिक e-KYC. यासाठी CSC केंद्र किंवा महाई सेवा केंद्रात जावे लागते. तिथे बोटाचा ठसा देऊन e-KYC होते. तिसरी आणि सर्वात सोपी पद्धत म्हणजे Face Authentication. यात मोबाईलवरच PM किसान ॲप डाउनलोड करायचे, आधार नंबर टाकायचा आणि चेहरा स्कॅन करायचा. हे घरबसल्या होते, कुठे जावे लागत नाही. या तीन पद्धतींपैकी Face Authentication ही सर्वात सोपी आणि जलद आहे. कुठलाही अँड्रॉइड मोबाईल असेल तर ही पद्धत वापरता येते.

Face Authentication साठी कोणती ॲप्स लागतात आधी डाउनलोड करा

Face Authentication द्वारे e-KYC करण्यासाठी दोन ॲप्स लागतात. दोन्ही Google Play Store वर मोफत उपलब्ध आहेत. पहिले ॲप म्हणजे “PM Kisan Mobile App” हे PM किसान योजनेचे अधिकृत ॲप आहे. Play Store मध्ये “PM Kisan” असे सर्च केल्यावर हे ॲप दिसते. त्याचा लोगो आणि नाव लक्षात ठेवायचे चुकीचे ॲप इन्स्टॉल होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. दुसरे ॲप म्हणजे “Aadhaar Face RD” हे आधारशी संबंधित चेहरा ओळखण्याचे ॲप आहे. Play Store मध्ये “Aadhaar Face RD” असे सर्च केल्यावर हे ॲप दिसते. हे ॲप असल्याशिवाय PM किसान ॲपमध्ये चेहरा स्कॅन होत नाही. त्यामुळे दोन्ही ॲप आधी इन्स्टॉल करायचे. इन्स्टॉल झाल्यावर e-KYC सुरू करता येते.

PM Kisan ॲप उघडताना पहिले काय करायचे Privacy Policy महत्त्वाची

PM Kisan ॲप इन्स्टॉल झाल्यावर ते उघडायचे. उघडल्यावर एक स्वागत पेज येते. या पेजवर “Privacy Policy” हा पर्याय असतो. Privacy Policy वर क्लिक करायचे हे वाचणे महत्त्वाचे आहे कारण यात ॲप तुमचा डेटा कसा वापरतो हे सांगितलेले असते. Privacy Policy वाचल्यावर वरच्या कोपऱ्यात “Next” बटण येते. त्यावर टच करायचे. एक गोष्ट लक्षात ठेवायची खूप जण स्वागत पेजवर थेट Next वर क्लिक करतात. पण Privacy Policy वर आधी क्लिक न केल्यास पुढे e-KYC नीट होत नाही. त्यामुळे Privacy Policy वर क्लिक करणे, ते वाचणे आणि मग Next दाबणे हे अनुक्रमे करायचे आहे.

लॉगिन कसे करायचे आधार नंबर कुठे टाकायचा?

Privacy Policy नंतर Next दाबल्यावर एक नवीन पेज येते. यात दोन पर्याय असतात “Update Mobile Number” आणि “Login”. आपल्याला e-KYC करायची असल्यामुळे “Login” वर क्लिक करायचे. Login वर क्लिक केल्यावर Login Type निवडायचे असते. “Beneficiary” हा पर्याय निवडायचा. Beneficiary म्हणजे लाभार्थी. Beneficiary निवडल्यावर दोन पर्याय येतात Registration ID किंवा Aadhaar Number. Registration ID म्हणजे PM किसान नोंदणी क्रमांक जो MS ने सुरू होतो. जर तो माहीत नसेल तर Aadhaar Number वापरायचा. “Aadhaar Number” वर क्लिक करायचे. आधार नंबर टाकायचा. त्यानंतर “Facial e-KYC Login” या पर्यायावर टच करायचे.

चेहरा स्कॅन कसे करायचे Face Authentication प्रक्रिया

Facial e-KYC Login वर टच केल्यावर एक सूचना पेज येते. त्यातील सूचना वाचायच्या. सूचनांसमोर एक चेकबॉक्स असतो तो टिक करायचा. मग “Scan Face” या पर्यायावर क्लिक करायचे. Scan Face वर क्लिक केल्यावर मोबाईलचा फ्रंट कॅमेरा आपोआप सुरू होतो. या कॅमेऱ्यात तुमचा चेहरा दाखवायचा. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या पुरेसा प्रकाश असावा. खूप जास्त उजेडात किंवा अंधारात चेहरा नीट दिसत नाही. खिडकीज

Keep Reading

Leave a Comment