प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2026: घरकुल सर्वेक्षणासाठी अंतिम मुदत वाढली! 31 जुलैपर्यंत करा सर्वे, अन्यथा मिळणार नाही लाभ

|
Facebook

PM आवास योजना ग्रामीण टप्पा २: सर्वेक्षणाची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढली आत्ताच ग्रामपंचायतीत जा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पात्र कुटुंबांच्या सर्वेक्षणाची म्हणजेच Awaas Plus 2024 Survey ची मुदत ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने १७ जुलै २०२६ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र काढलं आहे. या लेखात सर्वेक्षण का केलं जातं, कोणाला फायदा होतो, २०१८ मधील अपात्र झालेल्यांचा काय होणार, Self Survey म्हणजे काय, कोणत्या ग्रामपंचायतींनी काय करायचं आणि ही अंतिम संधी का आहे हे सगळं सविस्तर सांगितलं आहे.

खरीप पीक विमा 2026 ऑनलाइन कसा भरायचा? मोबाईलवरून घरबसल्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

PM आवास योजना ग्रामीण म्हणजे काय?

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ज्याला PMAY-G असंही म्हणतात ही केंद्र सरकारची योजना आहे. ग्रामीण भागातील बेघर किंवा कच्ची झोपडी असलेल्या कुटुंबांना पक्कं घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. यात लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतात त्यातून ते पक्कं घर बांधतात. ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबांसाठी हे एक मोठं वरदान आहे. या योजनेत टप्पा एक आधी झाला होता. आता टप्पा दोन सुरू आहे ज्यात नव्याने पात्र कुटुंबांचं सर्वेक्षण करून त्यांना लाभ दिला जाणार आहे.

उद्योग आधार (उद्यम रजिस्ट्रेशन) घरबसल्या मोफत कसे काढावे? संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

टप्पा दोन मध्ये एक विशेष गोष्ट आहे ज्या कुटुंबांना आधी लाभ मिळाला नाही, जे Waiting List मध्ये होते पण काही कारणाने त्यांना घरकुल मिळालं नाही, किंवा System ने चुकीने Reject झाले होते त्यांनाही आता संधी आहे. त्यांचं सर्वेक्षण होईल, ते पात्र असतील तर लाभ मिळेल.

सर्वेक्षण म्हणजे काय आणि ते का केलं जातं?

घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला आधी Survey करावं लागतं म्हणजे सर्वेक्षण. हे सर्वेक्षण म्हणजे तुमची सध्याची परिस्थिती तपासणे. तुमचं घर कसं आहे कच्चं आहे का, झोपडी आहे का, घरच नाही का हे तपासलं जातं. तुमचं उत्पन्न किती आहे, तुम्ही BPL यादीत आहात का, कुटुंबात कोण आहेत ही सगळी माहिती गोळा केली जाते. ही माहिती Awaas Software मध्ये Upload होते. त्यानंतर System निश्चित निकषांनुसार तुम्ही पात्र आहात का ते तपासतं. पात्र असाल तर Beneficiary List मध्ये नाव येतं आणि पुढे घरकुल मिळतं. सर्वेक्षण नाही झालं तर लाभ मिळणारच नाही कारण नाव यादीतच येत नाही.

लाडकी बहीण योजना 2026: 2100 रुपये कधी मिळणार? सरकारने दिली मोठी माहिती

मुदत ३१ जुलैपर्यंत का वाढवली?

केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे संचालक यांनी Awaas Plus 2024 सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी ३१ जुलै २०२6 पर्यंत मुदत वाढवली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने १७ जुलै २०२6 रोजी याबाबत अधिकृत पत्र काढलं. या पत्रात स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की ग्रामीण भागात अजूनही बऱ्याच पात्र कुटुंबांचं सर्वेक्षण बाकी आहे. कोणतंही बेघर कुटुंब या सर्वेक्षणापासून वंचित राहता कामा नये हा उद्देश यामागे आहे. त्यामुळे जे अजून राहिले आहेत त्यांना ही शेवटची संधी आहे.

एक महत्त्वाची गोष्ट या पत्रात नमूद केली आहे यापुढे कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. म्हणजे ३१ जुलैनंतर सर्वेक्षण बंद होईल आणि मग लाभ मिळणार नाही. त्यामुळे उशीर न करता आत्ताच सर्वेक्षण करून घ्या.

२०१८ मध्ये अपात्र झालेल्यांना संधी हे नक्की काय आहे?

२०१८ मध्ये पहिल्यांदा Awaas Survey झाला होता. त्यावेळी अनेक कुटुंबांचं नाव Waiting List मध्ये होतं म्हणजे ते पात्र दिसत होते पण Priority List मध्ये येऊ शकले नाहीत. काही कुटुंबे System ने Automatically Reject केली होती कदाचित माहिती चुकीची होती किंवा तांत्रिक कारणाने. अशा कुटुंबांना आधी लाभ मिळाला नाही.

सौर कृषी पंप योजना: वेंडर सिलेक्शन पुन्हा सुरू MS Premier Energy आली, इतर कंपन्याही येणार

आता टप्पा दोन मध्ये नवीन निकष लागू आहेत ज्याला “१० Exclusion Criteria” म्हणतात. या नवीन निकषांनुसार जे कुटुंब सध्या पात्र आहेत जरी ते २०१८ मध्ये Reject झाले असले तरी त्यांचं सर्वेक्षण होणार आहे. म्हणजे जुन्या यादीत नाव होतं पण घर मिळालं नाही अशा कुटुंबांनाही आता नव्याने संधी आहे. त्यांनी ग्रामपंचायतीत जाऊन सर्वेक्षण करून घ्यायला हवं.

सर्वेक्षणाच्या दोन पद्धती कोणत्या आहेत?

सर्वेक्षण दोन प्रकारे होऊ शकतं. पहिली पद्धत म्हणजे Self Survey म्हणजे स्वतः सर्वेक्षण. तुम्ही स्वतः Awaas App किंवा Portal वर जाऊन तुमची माहिती भरू शकता. हे घरबसल्या करता येतं मोबाईलवरून. दुसरी पद्धत म्हणजे ग्रामपंचायतीमार्फत सर्वेक्षण. ग्रामपंचायतीतील सर्वेक्षक तुमच्या घरी येतो, माहिती गोळा करतो आणि System मध्ये Upload करतो. दोन्ही पद्धती वैध आहेत. पण दोन्हींसाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख आहे.

पिको फॉल मशीन अनुदान योजना 2026: ग्रामीण महिलांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू! पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे

Self Survey केलेल्यांसाठी महत्त्वाची सूचना

ज्यांनी Self Survey केला आहे म्हणजे स्वतः Online माहिती भरली आहे त्यांच्या सर्वेक्षणाचं पुष्टीकरण म्हणजे Corroboration सर्वेक्षकाद्वारे ३१ जुलैपर्यंत पूर्ण करायचं आहे. म्हणजे Self Survey केलेल्यांची माहिती एक सर्वेक्षक प्रत्यक्ष येऊन किंवा इतर मार्गाने Confirm करतो की ती माहिती खरी आहे का. हे पुष्टीकरण झालं नसेल तर Self Survey पूर्ण मानला जात नाही. त्यामुळे Self Survey केलेल्यांनी ग्रामपंचायतीत जाऊन विचारावं की “माझ्या Self Survey चं Corroboration झालं का?” नाही झालं असेल तर ते तातडीने पूर्ण करायला सांगा.

शिवाय काही Self Survey प्रकरणं System ने Flag केलेली असतात म्हणजे System ला काही शंका आहे असं. अशा प्रकरणांचं Checker द्वारे Verification ३१ जुलैपर्यंत पूर्ण करायचं आहे. हे Verification ग्रामपंचायत किंवा तालुका पातळीवर होतं.

ग्रामपंचायतींसाठी काय सूचना आहेत?

ज्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वेक्षण पूर्ण झालं आहे त्यांनी Awaas Software System मध्ये “Survey Completed” असं Mark करायचं आहे ३१ जुलायपर्यंत. हे Mark न केल्यास त्या ग्रामपंचायतीचं सर्वेक्षण अपूर्ण मानलं जाऊ शकतं. ज्या ग्रामपंचायतींमध्ये अजून काही कुटुंबांचं सर्वेक्षण बाकी आहे त्यांनी आत्ताच मोहीम राबवून ते पूर्ण करायचं आहे. कोणतंही बेघर कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची खात्री करायची आहे.

मृत्यूपत्राचा सीलबंद लिफाफा जिल्हा निबंधक कार्यालयात कसा जमा करायचा? संपूर्ण प्रक्रिया

तुम्हाला आत्ता काय करायचं आहे?

जर तुमच्या घरात अजून पक्कं घर नाही, कच्चं घर आहे, झोपडी आहे किंवा अजिबात घर नाही आणि तुम्ही ग्रामीण भागात राहता तर तातडीने तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीत जा. ग्रामसेवकाला सांगा की “आमचं PM आवास योजनेसाठी सर्वेक्षण झालं नाही.” ते तुम्हाला पुढची प्रक्रिया सांगतील. ३१ जुलैपूर्वी सर्वेक्षण करून घ्या. हे नाही केलं तर पुढे मुदतवाढ मिळणार नाही आणि घरकुलाची ही संधी जाईल.

२०१८ मध्ये Reject झाला होता असं वाटत असेल म्हणजे नाव यादीत होतं पण घर मिळालं नाही तरी आत्ता ग्रामपंचायतीत जाऊन विचारा. नवीन निकषांनुसार तुम्ही पात्र असाल तर आता सर्वेक्षण होऊ शकतं आणि लाभ मिळू शकतो. ही संधी सोडू नका. घरातील इतरांना, शेजाऱ्यांना ही माहिती सांगा बरेच लोक या योजनेबद्दल माहित नसल्यामुळे संधी गमावतात.

शेतकरी कर्जमाफीत दोन मोठे बदल! नियमित कर्जदारांना खरोखर दिलासा की अजूनही अन्याय? संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2025 – महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरे (FAQ)

1. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजे काय?

उत्तर: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील पात्र आणि बेघर कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.

2. घरकुल सर्वेक्षणाची अंतिम मुदत किती आहे?

उत्तर: शासनाने आवास प्लस 2024 सर्वेक्षणाची अंतिम मुदत 31 जुलै 2025 पर्यंत वाढवली आहे.

महाराष्ट्रात स्मार्ट रेशन कार्डची एंट्री! QR कोडसह मिळणार नवे प्लास्टिक रेशन कार्ड, बोगस लाभार्थ्यांवर बसणार आळा

3. अंतिम मुदत का वाढवण्यात आली?

उत्तर: अनेक पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे कोणतेही पात्र कुटुंब वंचित राहू नये म्हणून मुदत वाढवण्यात आली आहे.

4. या निर्णयाबाबत शासनाने पत्र कधी जारी केले?

उत्तर: महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने 17 जुलै 2025 रोजी अधिकृत पत्र जारी केले आहे.

5. आवास प्लस 2024 सर्वेक्षण म्हणजे काय?

उत्तर: हे सर्वेक्षण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी पात्र लाभार्थी निश्चित करण्यासाठी केले जाते.

6. 2018 मध्ये अपात्र ठरलेल्यांना पुन्हा संधी मिळणार का?

उत्तर: होय. 2018 मधील प्रतीक्षा यादीतील किंवा सिस्टीमद्वारे अपात्र ठरलेल्या पण सध्या पात्र असलेल्या कुटुंबांचे पुन्हा सर्वेक्षण केले जाणार आहे.

पोकरा योजना टप्पा 2: तुमचे गाव निवडले आहे का? मोबाईलवरून ऑनलाइन कसे तपासाल? संपूर्ण माहिती

7. सर्वेक्षण कोणत्या निकषांवर होणार आहे?

उत्तर: नवीन 10 एक्सक्लुजन निकषांनुसार पात्रतेची तपासणी केली जाणार आहे.

8. सर्वेक्षण कोण करू शकतो?

उत्तर: सर्वेक्षण दोन प्रकारे करता येते.

लाभार्थी स्वतः (Self Survey)
ग्रामपंचायत किंवा नियुक्त सर्वेक्षकामार्फत
9. सेल्फ सर्वे केल्यानंतर काय होते?

उत्तर: सेल्फ सर्वे केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून माहितीची पडताळणी केली जाते.

10. फ्लॅग झालेल्या अर्जांचे काय होईल?

उत्तर: सिस्टीमने फ्लॅग केलेल्या अर्जांची स्वतंत्र पडताळणी संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जाईल.

MahaIndia Live टीम

MahaIndia Live टीम केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या योजना, शेतकरी अपडेट्स, कागदपत्रे व लाभार्थी माहिती अधिकृत स्रोतांवरून पडताळून सोप्या मराठी व हिंदी भाषेत सादर करते.

Keep Reading

Leave a Comment