मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन उद्योजकता योजना 2026: गाय, म्हैस, शेळी, कुक्कुटपालन, बैलजोडी, चारा आणि पशुपालनासाठी मोठे अनुदान

|
Facebook

मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन उद्योजकता योजना: गाय, शेळी, कुक्कुट, बैलजोडी सर्वांसाठी ५०% ते १००% अनुदान महाराष्ट्र सरकारने पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक मोठी योजना जाहीर केली आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन उद्योजकता योजना. यात जुन्या १४ वेगवेगळ्या योजना एकत्र करून एकाच छताखाली आणल्या आहेत. दुधाळ गाय, शेळी-मेंढी, कुक्कुट पालन, देशी बैलजोडी, चारा उत्पादन, हायड्रोपोनिक चारा, मिनी TMR मशीन, कडबाकुट्टी यंत्र, भ्रूण प्रत्यारोपण, लिंग विनिश्चित रेतमात्रा, कालवड पोषण आणि नरपाडू संगोपन या सगळ्यांसाठी ५०% ते १००% पर्यंत अनुदान मिळतं. या लेखात प्रत्येक योजनेचे लाभ, अनुदानाची रक्कम, SC/ST लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद, बनावट पोर्टलपासून सावधानता आणि अर्ज कधी सुरू होतील हे सगळं सविस्तर सांगितलं आहे.

मृत्यूपत्राचा सीलबंद लिफाफा जिल्हा निबंधक कार्यालयात कसा जमा करायचा? संपूर्ण प्रक्रिया

योजना का आणली आणि काय बदललं?

पशुपालन आणि शेतीला जोडणाऱ्या अनेक योजना आधी वेगवेगळ्या विभागांकडून राबवल्या जायच्या. शेतकऱ्यांना एका योजनेसाठी एका ठिकाणी, दुसऱ्या योजनेसाठी दुसऱ्या ठिकाणी जावं लागायचं. माहिती मिळवणं कठीण होतं. आता महाराष्ट्र सरकारने हे सगळं बदललं आहे. जुन्या १४ योजना बंद किंवा सुधारित करून त्या सगळ्या एकत्र केल्या आहेत आणि त्यांना “मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन उद्योजकता योजना” असं नाव दिलं आहे. आता एकाच पोर्टलवरून या सगळ्या योजनांसाठी अर्ज करता येईल. सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५०% अनुदान मिळेल आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५% अनुदान मिळेल काही योजनांमध्ये तर सर्वांना १००% अनुदान आहे. हे खूप मोठं बदल आहे.

बनावट पोर्टलपासून सावध राहा हे आधी वाचा

एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आधीच सांगणं गरजेचं आहे. या योजनेच्या नावाने अनेक बनावट पोर्टल तयार झाले आहेत. या बनावट पोर्टलवर अर्ज केला तर तुमची कागदपत्रे आणि माहिती चोरली जाते. राज्यभरातून पशुसंवर्धन विभागाकडे अशा तक्रारी आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या योजनेचं अधिकृत ऑनलाईन पोर्टल अजून सुरू झालेलं नाही. सरकार ते तयार करत आहे. पोर्टल लॉन्च झाल्यावरच अर्ज सुरू होतील. तोपर्यंत कोणत्याही ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करू नका, आधार नंबर देऊ नका आणि कागदपत्रे Upload करू नका. अधिकृत पोर्टल लॉन्च झालं की त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर येईल.

1 ऑगस्ट 2026 पासून पॅन कार्डचे नियम बदलले! नवीन अर्ज, नवीन फॉर्म आणि नवीन कागदपत्रे

योजना १: दुधाळ जनावर गट वाटप योजना

दूध उत्पादन वाढवायचं असेल तर ही योजना उत्तम आहे. या योजनेत एक किंवा दोन दुधाळ गाय किंवा म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदान मिळतं. एक गाय किंवा म्हशीची किंमत एक लाख रुपये गृहीत धरली आहे. विम्यासह एकूण खर्च एक लाख १३६ रुपये होतो. दोन गाय किंवा दोन म्हशी घ्यायच्या असतील तर गटाची किंमत दोन लाख रुपये असते. विम्यासह दोन लाख २,४७२ रुपये इतका खर्च गृहीत आहे. अनुदान सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५०% मिळेल आणि SC/ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५% मिळेल. म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गात दोन गाय घ्यायच्या असतील तर सुमारे एक लाख रुपये अनुदान मिळेल आणि SC/ST प्रवर्गात दीड लाखापर्यंत अनुदान मिळू शकेल.

योजना २: शेळी किंवा मेंढी गट वाटप योजना

शेळीपालन ग्रामीण भागात खूप लोकप्रिय आहे. या योजनेत दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय ५ शेळ्या + १ बोकड. दुसरा पर्याय १० शेळ्या + १ मेंढा. यापैकी एकच पर्याय निवडता येतो. प्रत्येक शेळीची किंमत १२,००० रुपये गृहीत आहे आणि बोकड किंवा मेंढ्याची किंमत १५,००० रुपये गृहीत आहे. विमा आणि GST मिळून ५ + १ गटाची एकूण किंमत ८६,२८४ रुपये होते. १० + १ गटाची एकूण किंमत १,५५,३११ रुपये होते. अनुदान सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५०% आणि SC/ST लाभार्थ्यांना ७५% मिळेल. म्हणजे SC/ST प्रवर्गात १० शेळ्या + १ मेंढा घेतला तर सुमारे एक लाख १६ हजार रुपये अनुदान मिळू शकेल.

उद्योग आधार (उद्यम रजिस्ट्रेशन) घरबसल्या मोफत कसे काढावे? संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

योजना ३: अंडी देणाऱ्या कुक्कुट पक्षी वाटप योजना

कुक्कुट पालन म्हणजे कोंबडीपालन हा एक चांगला व्यवसाय आहे. या योजनेत १६ ते १८ आठवडे वयाचे ५०० सुधारित किंवा देशी कुक्कुट पक्षी मिळतात. सोबत शेड, खाद्य-पाणी भांडी, अंडी ठेवण्याचे ट्रे आणि Nest यांच्यासाठीही अनुदान मिळतं. या पक्ष्यांनी किमान १८० ते २०० अंडी प्रतिवर्ष द्यावीत असे नियोजित आहे. एका पक्ष्याची किंमत ३५० रुपये आहे. दोन महिन्यांचा खाद्य खर्च ७.२ किलो प्रति पक्षी, २७ रुपये प्रति किलो गृहीत आहे. अर्धबंदिस्त पिंजरा-गादी पद्धतीने संगोपनासाठी प्रति पक्षी १०० रुपये गृहीत आहे. इतर साहित्यासाठी प्रति पक्षी २० रुपये गृहीत आहे. एकूण प्रकल्प खर्च ३,३२,२०० रुपये आहे. सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५०% म्हणजे सुमारे १,६६,१०० रुपये अनुदान मिळेल. SC/ST लाभार्थ्यांना ७५% म्हणजे सुमारे २,४९,१५० रुपये अनुदान मिळू शकेल.

योजना ४: देशी बैलजोडी खरेदी अनुदान योजना

पशुपालक शेतकऱ्यांसाठी ही योजना विशेष महत्त्वाची आहे. शेतीसाठी देशी बैलजोडी खरेदी करण्यासाठी हे अनुदान आहे. दोन बैलांची खरेदी किंमत १,५०,००० रुपये गृहीत आहे. यावर विमा म्हणजे सुमारे १०-२०% आणि १८% GST जोडल्यावर एकूण रक्कम १,६८,५६ रुपये इतकी होते. या एकूण रकमेवर सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५०% आणि SC/ST लाभार्थ्यांना ७५% अनुदान मिळेल. म्हणजे SC/ST प्रवर्गातील शेतकऱ्याला बैलजोडी खरेदीसाठी सुमारे १,२६,४२ रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकेल.

शेतकरी कर्जमाफीत दोन मोठे बदल! नियमित कर्जदारांना खरोखर दिलासा की अजूनही अन्याय? संपूर्ण माहिती

योजना ५: चारा बियाणे किंवा ठोंबांचा पुरवठा योजना

जनावरांसाठी चारा उत्पादन करायचं असेल तर ही योजना उपयुक्त आहे. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत चारा बियाणे किंवा ठोंबे म्हणजेच रोपे यांचा पुरवठा केला जातो. वैयक्तिक शेतकऱ्याला एक हेक्टरसाठी चार हजार रुपये १००% अनुदानावर मिळतात. शेतकरी समूह किंवा गट असेल तर पाच हेक्टरसाठी वीस हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान मिळतं. हे १००% अनुदान असल्यामुळे शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून एकही रुपया द्यायची गरज नाही.

योजना ६: हायड्रोपोनिक तंत्राद्वारे चारा उत्पादन योजना

हायड्रोपोनिक म्हणजे मातीशिवाय पाण्यात पिकवलेला चारा. कमी जागेत जास्त हिरवा चारा मिळतो हे तंत्रज्ञान आता ग्रामीण भागातही वापरणं सोपं झालं आहे. या योजनेत पाच Rack Frames, २५ Plastic Trays, पाणी टँक, पाइपिंग, पंप, Misting सिंचन यंत्रणा, Greenhouse, Shade Net आणि इतर उपकरणे या सगळ्यासाठी अनुदान मिळतं. एकूण प्रकल्प खर्च ४०,००० रुपये गृहीत आहे. सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५०% म्हणजे २०,००० रुपये अनुदान मिळेल. SC/ST लाभार्थ्यांना ७५% म्हणजे ३०,००० रुपये अनुदान मिळेल.

खरीप पीक विमा 2026 ऑनलाइन कसा भरायचा? मोबाईलवरून घरबसल्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

योजना ७: मिनी TMR उपकरण खरेदी अनुदान

TMR म्हणजे Total Mixed Ration जनावरांना द्यायचं मिश्र भरड. या मशीनमध्ये वाळलेला चारा, ओला चारा, सरकी पेंड, मका आणि इतर घटक एकत्र मिसळले जातात आणि जनावरांना एकाच वेळी संतुलित आहार मिळतो. यामुळे दूध उत्पादन वाढतं. ३०० किलो प्रति Batch क्षमतेच्या मिनी TMR मशीनची किंमत ४,४०,००० रुपये गृहीत आहे. सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५०% म्हणजे २,२०,००० रुपये अनुदान मिळेल. SC/ST लाभार्थ्यांना ७५% म्हणजे ३,३०,००० रुपये अनुदान मिळेल.

योजना ८: कडबाकुट्टी यंत्र खरेदी अनुदान

कडबा, गवत, ऊस पाचट किंवा इतर वाळलेला चारा बारीक कापण्यासाठी कडबाकुट्टी यंत्र वापरतात. यामुळे चारा वाया जात नाही आणि जनावरे नीट खातात. या यंत्राची खरेदी मर्यादा ३०,००० रुपये गृहीत आहे. सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५०% म्हणजे १५,००० रुपये अनुदान मिळेल आणि SC/ST लाभार्थ्यांना ७५% म्हणजे २२,५०० रुपये अनुदान मिळेल.

श्रावण बाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना 2026: 65 वर्षांवरील वृद्धांना दरमहा ₹1,500 आर्थिक मदत!

योजना ९: भ्रूण प्रत्यारोपण अनुदान १००% सर्वांना

गाय किंवा म्हशीच्या अनुवांशिक सुधारणेसाठी हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे. उच्च दर्जाच्या जातीचं भ्रूण दुसऱ्या गाईत प्रत्यारोपित केलं जातं यामुळे उत्तम दूध देणाऱ्या जातीची वासरे मिळतात. एका भ्रूण प्रत्यारोपणाचा खर्च ८,००० रुपये आहे. साधारण तीन प्रयत्नांत यश येतं म्हणून एकूण २४,००० रुपये गृहीत आहे. विशेष म्हणजे ही योजना सर्व प्रवर्गांसाठी १००% अनुदानावर आहे. म्हणजे २४,००० रुपये पूर्णपणे सरकार देतं शेतकऱ्याला एकही रुपया द्यायचा नाही.

योजना १०: लिंग विनिश्चित रेतमात्रा १००% सर्वांना

हे आधुनिक तंत्रज्ञान आहे ज्यात रेतमात्रेतून फक्त कालवडी म्हणजे मादी वासरे जन्माला येण्याची शक्यता जास्त असते. यामुळे दूध उत्पादन वाढवण्यासाठी मादी जनावरांची संख्या वाढते. एका रेतमात्रेची किंमत ५७५ रुपये किंवा वेळोवेळी सरकार जी रक्कम ठरवेल ती असेल. ही योजनाही सर्व प्रवर्गांसाठी १००% अनुदानावर आहे. म्हणजे रेतमात्रेचा खर्च पूर्णपणे सरकार उचलतं.

पिको फॉल मशीन अनुदान योजना 2026: ग्रामीण महिलांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू! पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे

योजना ११: कालवड किंवा पाडू पोषण अनुदान

लहान वासरे किंवा पाडू यांना वाढीसाठी पोषक खाद्य लागतं. या योजनेत सुधारित किंवा देशी जातीच्या कालवडी किंवा पाड्यांना पशुखाद्य पुरवठा करण्यासाठी सर्व प्रवर्गांना ५०% अनुदान मिळतं.

योजना १२: नरपाडू म्हणजे रेडकू संगोपन प्रोत्साहन योजना

बऱ्याच ठिकाणी नर वासरे म्हणजे पाडू किंवा रेडकू जन्मल्यावर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे टाळण्यासाठी ही योजना आहे. एका नरपाडू किंवा रेडक्याच्या संगोपनासाठी सहा हजार रुपये अर्थसाहाय्य मिळतं. यात खाद्य, औषधे आणि देखभाल खर्चाचा समावेश आहे. हे पैसे दोन टप्प्यात मिळतात पाडू किंवा रेडकू सहा महिने वयाचं झाल्यावर ५०% म्हणजे तीन हजार रुपये मिळतात आणि एक वर्ष वयाचं झाल्यावर उरलेले ५०% म्हणजे आणखी तीन हजार रुपये मिळतात. हे सर्व प्रवर्गांसाठी लागू आहे.

महाडीबीटी पोर्टलवरील सर्व योजना 2026: ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, फळबाग, विहीर, ग्रीन हाऊससह अनेक योजनांवर मोठे अनुदान

अर्ज कधी आणि कसा करायचा?

सध्या या योजनेचं अधिकृत ऑनलाईन पोर्टल तयार होत आहे. ते लॉन्च झाल्यावरच अर्ज सुरू होतील. पोर्टल लॉन्च होण्यापूर्वी कोणत्याही वेबसाईटवर अर्ज केला तर तो फसवणूक असू शकतो. अधिकृत पोर्टल सुरू झालं की पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आणि सरकारी GR मध्ये ती माहिती येईल. तोपर्यंत GR डाउनलोड करा आणि वाचा त्यात प्रत्येक योजनेची पात्रता, लाभार्थी निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अटी व शर्ती सविस्तर दिल्या आहेत. तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते आधी ठरवा आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा पोर्टल आलं की लगेच अर्ज करता येईल.

पशुपालन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा विस्तारायचा असेल तर ही योजना एक मोठी संधी आहे. ५०% ते १००% अनुदान मिळत असल्यामुळे गुंतवणूक खूप कमी लागते. ओळखीच्या पशुपालक शेतकऱ्यांना ही माहिती सांगा आणि अधिकृत पोर्टल आल्यावर लगेच अर्ज करा.

सौर कृषी पंप योजना: वेंडर सिलेक्शन पुन्हा सुरू MS Premier Energy आली, इतर कंपन्याही येणार

मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन उद्योजकता योजना 2026 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1. मुख्यमंत्री ग्रामीण पशुसंवर्धन उद्योजकता योजना म्हणजे काय?

ही महाराष्ट्र शासनाची योजना असून ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांना पशुपालन व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य आणि अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत 14 विविध योजना एकत्र करण्यात आल्या आहेत.

2. या योजनेत कोणकोणत्या योजनांचा समावेश आहे?

या योजनेत दुधाळ गाय किंवा म्हैस खरेदी, शेळी-मेंढी गट, कुक्कुटपालन, देशी बैलजोडी, चारा उत्पादन, हायड्रोफोनिक चारा, मिनी टीएमआर मशीन, कडबाकुट्टी यंत्र, भ्रूण प्रत्यारोपण, लिंग निश्चित रेतमात्रा, कालवड-पाडे संगोपन आणि रेडकू संगोपन यांसारख्या योजना समाविष्ट आहेत.

महाराष्ट्र शासनाचे नवीन दिव्यांग पोर्टल सुरू; एकदाच नोंदणी करा आणि विविध योजनांसाठी घरबसल्या अर्ज करा

3. दुधाळ गाय किंवा म्हैस खरेदीसाठी किती अनुदान मिळते?

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान मिळते.

4. शेळी किंवा मेंढी गटासाठी किती अनुदान मिळेल?

5+1 किंवा 10+1 गटासाठी सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान दिले जाते.

5. 500 कुक्कुट पक्षी प्रकल्पासाठी किती अनुदान मिळते?

या प्रकल्पाची अंदाजित किंमत ₹3,32,200 असून त्यावर सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गाला 75% अनुदान मिळते.

6. देशी बैलजोडी खरेदीसाठी किती आर्थिक मदत मिळते?

देशी बैलजोडी खरेदीसाठी अंदाजित प्रकल्प खर्च ₹1,68,856 असून त्यावर 50% किंवा 75% अनुदान मिळते.

7. चारा बियाणे योजनेत किती अनुदान मिळते?

वैयक्तिक लाभार्थ्यांना 1 हेक्टरसाठी 100% अनुदान (कमाल ₹4,000) आणि शेतकरी गटांना 5 हेक्टरपर्यंत कमाल ₹20,000 अनुदान दिले जाते.

MahaIndia Live टीम

MahaIndia Live टीम केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या योजना, शेतकरी अपडेट्स, कागदपत्रे व लाभार्थी माहिती अधिकृत स्रोतांवरून पडताळून सोप्या मराठी व हिंदी भाषेत सादर करते.

Keep Reading

Leave a Comment